विराटने या खेळाडूसमोर जोडले हात

क्रिकेटमध्ये एका सामन्यात एखादा खेळा़डू हीरो बनू शकतो, असचं काहीसं पाहायला मिळाले. चक्क विरोट कोहलीने हात जोडून स्वागत केले.

Updated: Apr 30, 2015, 01:06 PM IST
विराटने या खेळाडूसमोर जोडले हात title=

नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये एका सामन्यात एखादा खेळा़डू हीरो बनू शकतो, असचं काहीसं पाहायला मिळाले. चक्क विरोट कोहलीने हात जोडून स्वागत केले.

राजस्थान रॉयल आणि रॉयल चॅलेन्जर्स बेंगलुरू यांच्यात झालेल्या कालच्या सामन्यात. जेव्हा १७ वर्षांच्या सहफारजने उत्कृष्ट प्रदर्शन करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या खेळीवर खूश होऊन विराटने त्याचं अनोख्या पद्धतीने स्वागत केले.

सरफराज खाननं राजस्थान रॉयरविरूद्धच्या मॅचमध्ये २१ चेंडूत ४५ धावांची जबरदस्त खेळी केली. बाद झाल्यानंतर जेव्हा सरफराज पॅव्हेलिअनमध्ये येत होता त्यावेळी विराटने त्याच्यासमोर हात जोडून त्याचं अनोख्या पद्धतीने अभिनंदन केलं.

 

रॉयल चॅलेन्जर्स बेंगलुरू आणि राजस्थान यांच्यातील हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना एक-एक गूण देण्यात आला आहे. त्यामुळे आता राजस्थान गुणतालिकेत १२ गुण झाले आहे, तर बेंगळुरूचे ६ सामन्यात ७ गुण झाले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.