चौथ्या टेस्टमध्ये कोहली नाही, अजिंक्य रहाणे कॅप्टन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टला विराट कोहली मुकणार आहे.

Updated: Mar 25, 2017, 09:04 AM IST
चौथ्या टेस्टमध्ये कोहली नाही, अजिंक्य रहाणे कॅप्टन title=

धर्मशाला : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टला विराट कोहली मुकणार आहे. विराटऐवजी अजिंक्य रहाणे टीमचं नेतृत्व करेल. विराट कोहलीऐवजी स्पिनर कुलदीप यादवचा भारतीय संघामध्ये समावेश करण्यात आला आहे.

रांची टेस्टच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. हिमाचल प्रदेशच्या धर्मशालामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मॅच होत आहे. पुण्यातली पहिली टेस्ट कांगारूंनी जिंकल्यावर भारतानं बंगळुरूमध्ये कमबॅक केलं तर रांचीमधली तिसरी टेस्ट ड्रॉ झाली, त्यामुळे सीरिज जिंकण्यासाठी या दोन्ही टीम मैदानात उतरतील.