धर्मशाळा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या आणि चौथ्या टेस्टसाठी भारतीय टीममध्ये बदल करण्यात आले आहेत. श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी या दोघांचा भारतीय टीममध्ये संधी देण्यात आली आहे.
खांद्याच्या दुखापतीमुळे विराट कोहलीच्या खेळण्याबाबत अजूनही साशंकता आहे. त्यामुळे विराट कोहलीऐवजी श्रेयस अय्यरला टीममध्ये संधी मिळू शकते तर इशांत शर्माऐवजी मोहम्मद शमीची निवड होऊ शकते. विराट कोहली ही मॅच खेळला नाही तर अजिंक्य रहाणेकडे टीमचं नेतृत्व करेल.
हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळामध्ये या टेस्ट मॅचला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. पुण्यातली पहिली टेस्ट कांगारूंनी जिंकल्यावर भारतानं बंगळुरूमध्ये कमबॅक केलं तर रांचीमधली तिसरी टेस्ट ड्रॉ झाली, त्यामुळे सीरिज जिंकण्यासाठी या दोन्ही टीम मैदानात उतरतील.