नवी दिल्ली : भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंह याला पछाडण्यासाठी हंगेरीचा बॉक्सर एलेक्सझेंडर हारवर्थ नेटानं तयारी करतोय... स्वत:ला विजेंदरपेक्षा बलवान सिद्ध करण्यासाठी आता तर त्यानं सापाचं रक्त पिणं सुरू केलंय... आणि ही गोष्ट स्वत: हारवर्थनंच जगाला सांगितलीय.
हारवर्थ आणि विजेंदर यांच्यात लिवरपूलमध्ये १२ मार्च रोजी लढत रंगणार आहे. २० वर्षांचा हारवर्थ त्यामुळे थोडा घाबरा-घुबरा झालाय. आपल्या कुटुंबात सापाचं रक्त पिण्याची जुनी परंपरा आहे. सध्या विजेंदरला हरवण्यासाठी मी सापाचं रक्त पितोय. हे सुरू केल्यानंतर मी जास्त ट्रेनिंग करू शकतोय, असं हारवर्थनं म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे विजेंदरनं आत्तापर्यंत खेळलेले आपले तीनही प्रोफेशनल लढती नॉक-आऊट पंचनं जिंकल्यात. अशामध्ये या सामन्यातही विजेंदर यालाच विजयाचा दावेदार मानलं जातंय.
परंतु, अनुभवाच्या बाबतीत हारवर्थ विजेंदरपेक्षा पुढे आहे. हारवर्थनं ३१ राऊंडमधले ५ राऊंड जिंकलेत, एक हरलाय तर एक ड्रॉ झालाय.