मास्टर ब्लास्टरनं संघकारा, जयवर्धनेला निवृत्तीनंतर दिल्या शुभेच्छा!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसहीत क्रिकेट जगतातील अनेकांनी श्रीलंकेचा अनुभवी क्रिकेटर कुमार संघकारा आणि महेला जयवर्धने यांचं तोंडभरून कौतुक केलंय. 

Updated: Mar 18, 2015, 05:53 PM IST
मास्टर ब्लास्टरनं संघकारा, जयवर्धनेला निवृत्तीनंतर दिल्या शुभेच्छा! title=

सिडनी : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसहीत क्रिकेट जगतातील अनेकांनी श्रीलंकेचा अनुभवी क्रिकेटर कुमार संघकारा आणि महेला जयवर्धने यांचं तोंडभरून कौतुक केलंय. 

संघकारा आणि जयवर्धने यांनी वर्ल्डकप 2015च्या लढतीत क्वार्टर फायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर वन डे क्रिकेटला रामराम ठोकलाय.

हे वर्ल्डकप आपल्या क्रिकेट करिअरमधील शेवटचं वन डे स्पर्धा असेल अशी घोषणा जयवर्धने आणि संघकारानं अगोदरच केली होती. या दोघांसाठी टूर्नामेंटचा शेवट निराशाजनकच राहिला. आज झालेल्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये टीमला दक्षिण आफ्रिकेकडून तब्बल नऊ विकेटसनं पराभव स्वीकारावा लागला. 

पण, संघकारा आणि जयवर्धने यांच्या वन डे निवृत्तीच्या घोषणेनंतर क्रिकेट जगतातील अनेकांनी त्यांचं कौतुक केलंय. सचिन तेंडुलकरनं आपल्या ट्विटमध्ये 'आपल्या भव्य अशा वनडे करिअरमध्ये कुमार संघकारा, महेला जयवर्धने यांनी शानदार प्रदर्शन केलं. इतक्या वर्षांपर्यंत टीमचा महत्त्वाचा भाग बनल्यानंतर तुम्हा दोघांविना टीमची कल्पना करणं खूप कठिण आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि रंगीत कपड्यांमध्ये तुम्हा दोघांना डाव सांभाळताना आता पाहता येणार नाही' असं म्हटलंय. 

संघकारानं 404 वन डे आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 41.98 च्या सरासरीनं 14,234 रन्स केले. तर जयवर्धने यानं 448 वन डे मॅचमध्ये 33.37 च्या सरासरीनं 12,650 रन्स ठोकलेत.

पाहुयात, क्रिकेट आणखी काही ट्विटस्

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.