विजयी भारतीय संघाचं जंगी स्वागत

बंगळुरु कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुध्द मिळवलेल्या विजयानंतर भारतीय संघाचं टीम हॉटेलमध्ये जंगी स्वागत झालं.

Updated: Mar 8, 2017, 11:17 AM IST
विजयी भारतीय संघाचं जंगी स्वागत title=

नवी दिल्ली : बंगळुरु कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुध्द मिळवलेल्या विजयानंतर भारतीय संघाचं टीम हॉटेलमध्ये जंगी स्वागत झालं.

हॉटेल स्टाफनं या विजयी भारतीय संघाचं टाळ्या वाजवून आणि केक कापून अभिनंदन केलं.

कसोटी क्रिकेटमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या कांगारुंवर विजय मिळवल्याने हॉटेल स्टाफनं आपला आनंद असा साजरा केला. हॉटेल स्टाफने खेळाडू आणि सहकाऱ्यांचं केलेलं कौतुक आणि स्वागत पाहू शकता 'टीम इंडीया'नं फेसबुकवर अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये... 

मंगळवारी भारताने ऑस्ट्रेलिया संघाला ऑल आऊट करुन ७५ धावांनी विजय मिळवला. आपल्या भेदक गोलंदाजीनं निम्मा संघ ड्रेसिंग रुममध्ये पाठवणारा आर. अश्विन या विजयाचा शिल्पकार ठरला. चार सामन्यांच्या या मालिकेत भारतानं १-१ नं बरोबरी केलीय.