'कोणी काय करावं? एकनाथ शिंदेंच्या वाट्याला...,' अजित पवार स्पष्टच बोलले; 'त्यांच्याबद्दल मी...'

Ajit Pawar on Mahayuti: उद्या आम्ही तिघं दिल्लीला जाणार आहोत. यानंतर तिथे सर्व चर्चा होईल. यानंतर सरकार अस्तित्वात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 27, 2024, 07:46 PM IST
'कोणी काय करावं? एकनाथ शिंदेंच्या वाट्याला...,' अजित पवार स्पष्टच बोलले; 'त्यांच्याबद्दल मी...' title=

Ajit Pawar on Mahayuti: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार की देवेंद्र फडणवीस यावरुन संभ्रम कायम होता. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला आहे. त्यानंतर अजित पवार यांनी उद्या आम्ही तिघं दिल्लीला जाणार आहोत. यानंतर तिथे सर्व चर्चा होईल. यानंतर सरकार अस्तित्वात येईल अशी माहिती दिली आहे. तसंच ईव्हीएमला दोष देणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. यावेळी त्यांनी 30 डिसेंबर किंवा 1 नोव्हेंबरला शपथविधी होईल अशी माहितीही दिली आहे. 

"आमच्यावर जबाबदारी वाढली आहे. आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यानंतर बावनकुळे यांनीही संवाद साधला. मी प्रवासात असल्याने ऐकता आली नाही. पण उद्या आम्ही तिघं दिल्लीला जाणार आहोत. तिथे सर्व चर्चा होईल. यानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यंत्र्यांचं सरकार अस्तित्वात येईल. लगेच हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. यामुळे पुरवणी मागण्या पूर्ण करुन घ्याव्या लागतील. पण आम्ही अनुभवी असल्याने फार अडचण येणार नाही. राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा, केंद्राचा मोठी निधी आणण्याचा प्रयत्न आमचा असेल. उद्याच्या चर्चेनंतर सरकारला अंतिम रुप येईल," अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. 

एकनाथ शिंदे यांनी CM पदावरचा दावा सोडल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले 'मनात...'

 

"कोणी काय करावं? एकनाथ शिंदेंच्या वाट्याला काय जागा येतील आणि कुठली पदं येतील त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार शिंदे साहेबांकडे आहे. आमच्या बाबतीत तो आमच्याकडे आहे. त्यांच्याबद्दल मी कसं काय सांगू शकतो," असं अजित पवार म्हणाले. कार्यकर्त्यांना काही वाटत असलं तरी कोणाची किती संख्या आहे? किती निवडून आले? हेदेखील पाहिलं जातं असं सांगत त्यांनी आपण या स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केलं. 

Eknath Shinde on Maharashtra CM: एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेतील 6 महत्त्वाची विधानं; ज्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही

 

मनसेने ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले, "सुप्रीम कोर्टाने स्वत: यावर भाष्य केलं आहे. प्रत्येक वेळी निवडणुकीत ज्यांचा पराभव होतो तो ईव्हीएमच्या माथी मारला जातो. यश आलं की मात्र ईव्हीएम चांगलं. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची खराब कामगिरी झाली होती. आम्ही त्यासाठी ईव्हीएमला दोष दिला नव्हता. ईव्हीएम आज आलेलं नाही. आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबळ वाढवण्यासाठी, पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते, वरिष्ठ दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, कर्नाटक, केरळ येथे निकाल लागला की ईव्हीएम चांगलं, पण उलट गेलं की वाईट".

"दारुण पराभव झाल्यावर ते कसं सांगावं म्हणून कोणाच्या तरी माथी मारलं जातं. आमचा निकाल चांगला लागला असता, पण ईव्हीएममुळे ही वेळ आमच्यावर आली असं सांगत जवळच्या कार्यकर्त्यांना आपला नेता भांडतोय असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. हा त्यांचा प्रश्न आहे काय करायचं. पण बहुतेक लोकांचा ईव्हीएमर विश्वास आहे," असंही ते म्हणाले. 

हे काही एका दिवसात घडत नव्हतं. ईव्हीएमच्या बाबतीत रशिया, अमेरिकेचे दाखले देत बसतात असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. निवडणूक आयोगाने ईव्हीएमवर विश्वास असल्याचं सांगितलं आहे याची आठवण करुन दिली.