ती चूक स्टिव्ह स्मिथनं स्वीकारली

डिसिजन रिव्ह्यू करताना ड्रेसिंग रूमची मदत मागणं ही माझी चूक होती

Updated: Mar 7, 2017, 10:51 PM IST
ती चूक स्टिव्ह स्मिथनं स्वीकारली title=

बंगळुरू : डिसिजन रिव्ह्यू करताना ड्रेसिंग रूमची मदत मागणं ही माझी चूक होती, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथनं केलं आहे. बंगळुरूमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये उमेश यादवच्या बॉलिंगवर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव स्मिथला अंपायरनं एलबीडब्ल्यू आऊट दिलं. पण अंपायरचा हा निर्णयाचा रिव्ह्यू घ्यायचा का नाही हे विचारण्यासाठी स्मिथनं ड्रेसिंग रूमकडे इशारा केला.

आयसीसीच्या नियमांनुसार रिव्ह्यू घेताना ड्रेसिंग रुमचा सल्ला घेता येत नाही. स्मिथची ही चिटिंग बघितल्यानंतर पाहून विराट कोहली मात्र चांगलाच भडकला. अंपायरनीही यानंतर स्मिथला सुनावलं.

पाहा नेमकं काय केलं होतं स्टिव्ह स्मिथनं