रांची : रेफरलसाठी ड्रेसिंग रूमची मदत घेतल्याचे कोहलीचे दावा चुकीचे असल्याचे सांगत कोहलीचे दावे बावळटपणाचे आहे, अशा उलट्या बोंबा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने मारल्या आहेत. तसेच आपण नुकतेच सामन्याचे मुख्य पंच रिचर्डसन आणि इतर पंचांशीही बोललो असल्याचे सांगितले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने भारतीय कर्णधार विराट कोहलीने केलेला दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. रांची कसोटीच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने बंगळुरू कसोटीत स्मिथसोबत झालेल्या डीआरएस प्रणालीवरच्या वादावर भाष्य केले होते.
वारंवार एक गोष्ट जाणूनबुजून केली जात असेल तर त्याकडे दुर्लक्ष करायला आम्ही मूर्ख नाही. त्यामुळे मी जे काही बोललो त्याची मला अजिबात खंत नाही, असे कोहलीने म्हटले.
प्रत्युत्तरात स्मिथने कोहलीचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
कोहलीने केलेल्या दाव्याला स्मिथने बावळटपणा ठरवला आहे. स्मिथ म्हणाला की, कोहलीचा दावा म्हणजे बावळटपणाच आहे. सामना झाल्यानंतर मी स्वत: माझ्याकडून झालेल्या चुकीची कबुली दिली होती. आम्ही वारंवार डीआरएस निर्णयासाठी ड्रेसिंग रुमकडे पाहात होतो हा दावा चुकीचा आहे. झालेल्या प्रसंगाचे स्पष्टीकरण देताना कोहली चुकला आहे.
कोहलीने पत्रकार परिषदेत बंगळुरूत झालेल्या प्रसंगाला आता ताणून धरण्यात काहीच अर्थ नसल्याचेही म्हटले. आमचे संपूर्ण लक्ष आता उर्वरित दोन कसोटी सामन्यांकडे आहे. झालेल्या गोष्टी वारंवार गिरवत बसण्यात काहीच अर्थ नाही. जुन्या गोष्टी टाळून पुढे जायला हवं आणि आम्ही तेच करत आहोत, असे कोहलीने स्पष्ट केले होते. आगामी काळात आणखी खूप क्रिकेट खेळायचे आहे. त्यामुळे भविष्यात या गोष्टी वाढून वातावरण खराब होऊ नये, असे वाटत असल्याचेही कोहलीने सांगितले होते.
कोहलीचे दाव चुकीचे असल्याचे सांगत स्मिथने आपण नुकतेच सामन्याचे मुख्य पंच रिचर्डसन आणि इतर पंचांशीही बोललो असल्याचे सांगितले. पंचांनी शेवटी क्रिकेटचाच विजय होतो. त्यामुळे दोन्ही संघांनी नियमांचे पालन करून खेळले पाहिजे. भारत आणि ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिेका नेहमी सर्वोत्तम होते, असे सांगितले. त्यामुळे या आठवड्यात विजेता संघ ठरेल. सध्या क्रिकेटकडेच लक्ष केंद्रीत करणार असल्याचे स्मिथ म्हणाला.