शोएब मलिकची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शारजात इंग्लंड विरूद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर शोएबने ही घोषणा केली आहे.

Updated: Nov 3, 2015, 09:21 PM IST
शोएब मलिकची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती title=

शारजा : पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शारजात इंग्लंड विरूद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर शोएबने ही घोषणा केली आहे.

शोएब मलिक आता ३३ वर्षांचा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने इंग्लंडविरू्दध झालेल्या सामन्यातच पदार्पण केलं होतं, त्याच्या करिअरमध्ये २४५ सर्वोत्तम धावा आहेत. पण त्यानंतर कसोटीत शोएब बऱ्याच वेळा शून्यावर, कधी दोन तर कधी सात, ३८ धावांवर तंबूत परतलाय.

मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे, कारण मला माझ्या परिवाराला जास्त वेळ द्यायचा आहे, तसेच मला २०१९ च्या वर्ल्डकपवर लक्ष केंद्रीत करायचे असल्याचं शोएब मलिकने म्हटलं आहे.  शोएब मलिकने भारताची टेनिस क्रिकेट स्टार सानिया मिर्झाशी २०१० साली लग्न केलं, तेव्हा दोनही देशात हा चर्चेचा विषय होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.