पाकिस्तानच्या स्पिनरचा हरभजनसिंहवर गंभीर आरोप

पाकिस्तानचा स्पिनर सईद अजमलने, टीम इंडियाचा स्पिनर हरभजनसिंह आणि आर अश्विन चकर असल्याचा आरोप केला आहे.

Updated: Nov 3, 2015, 06:22 PM IST
पाकिस्तानच्या स्पिनरचा हरभजनसिंहवर गंभीर आरोप title=

मुंबई : पाकिस्तानचा स्पिनर सईद अजमलने, टीम इंडियाचा स्पिनर हरभजनसिंह आणि आर अश्विन चकर असल्याचा आरोप केला आहे.

हरभजन आणि आर.अश्विन बॉलिंग करतांना चकिंग म्हणजेच फसवणूक करतो, हरभजन आणि अश्विनच्या बॉलिंग अॅक्शनवर त्याने आरोप केले आहेत.

मी दाव्याने सांगू शकतो की, हरभजनचा हात-खांदा पंधरा डिग्रीच्या बाहेर जातो, जो नियमानुसार जायला नको, अजमलचा हा दावा अब्बासने ट्वीट केला आहे.

अब्बास म्हणतो, मी अजमलला एवढं नाराज कधीच पाहिलं नाही. अजमलवर मागील वर्षी चुकीच्या बॉलिंग अॅक्शनमुळे सप्टेंबर महिन्यात बंदी लावण्यात आली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.