व्हॅलेंटाईन डे स्पेशल : सचिन-अंजलीची लव्हस्टोरी

पहिल्या भेटीनंतर सचिन आणि अंजली पाच वर्षे नात्यात होते...

Updated: Feb 14, 2019, 09:50 AM IST
व्हॅलेंटाईन डे स्पेशल : सचिन-अंजलीची लव्हस्टोरी title=

मुंबई : मैदानावर बॅटने फलंदाजांची धुलाई कऱणाऱ्या भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरची लव्हस्टोरी इतरांप्रमाणेच सारखी मात्र त्यातही वेगळी अशी होती. सचिन आणि पत्नी अंजलीची पहिली भेट १९९०मध्ये मुंबई एअरपोर्टवर झाली. यावेळी सचिन इंग्लंडचा दौरा करुन मायदेशी परतत होता. 

पहिल्या भेटीनंतर सचिन आणि अंजली पाच वर्षे नात्यात होते. मात्र यात विशेष म्हणजे याची खबर कुणालाच नव्हती. जेव्हा १९९४ मध्ये त्यांनी साखरपुडा केला तेव्हा दोघांनी आपल्या नात्याचा खुलासा केला. पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये असताना या दोघांनी एकत्र चित्रपटही पाहिला नव्हता. लग्नाच्या आधी त्यांनी केवळ रोजा हा चित्रपट पाहिला होता. 

त्यानंतर काही महिन्यांत २४ मे १९९५ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी आपल्याहून सहा वर्षे वयाने मोठ्या असलेल्या डॉक्टर अंजलीशी त्याने लग्न केले. त्याच्या अचानक लग्नाने चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. 
लग्नानंतर १८ वर्षे त्याची क्रिकेटमधील कारकीर्द सुरु होती. या कारकिर्दीदरम्यान सचिनने अनेक रेकॉर्ड बनवले. सचिन क्रिकेटच्या मैदानावर असताना फार कमी वेळा अंजली स्टेडियममध्ये उपस्थित राहत असते. मात्र क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ती अनेकदा सचिनसोबत दिसली. 

सचिन आणि अंजली यांना सारा आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. साराचा जन्म १९९७ मध्ये झाला तर सचिनच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेटमध्ये उतरणाऱ्या अर्जुनचा जन्म १९९९मध्ये झाला.