साक्षी म्हणतेय, आमच्या लग्नाला यायचं हं!

कुस्तीपटू साक्षी मलिक हिने आपल्या लग्नाची तारीख अनोख्या पध्दतीने आपल्या चाहत्यांना सांगितली.

Intern Intern | Updated: Mar 27, 2017, 07:27 PM IST
साक्षी म्हणतेय, आमच्या लग्नाला यायचं हं!  title=

नवी दिल्ली : ऑलिम्पिक कांस्यपदकविजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने आपल्या लग्नाची तारीख अनोख्या पध्दतीने आपल्या चाहत्यांना सांगितली.

कुस्तीपटू सत्यव्रत कादियनसोबत काही महिन्यांपूर्वीच तिचा साखरपुडा झाला होता आणि येत्या एप्रिलमध्ये ते दोघं लग्न करताहेत.

तिच्या होणाऱ्या नवऱ्याने त्यांचा एक गोड फोटो फेसबुकवर पोस्ट केलाय.  त्या फोटोत त्याने साक्षीला टॅग केलंय आणि याच फोटोतून ते दोघं आपल्या लग्नाची तारीख दाखवताहेत.

दोन्ही कुटूंबात त्यांच्या लग्नाची तयारी चालू आहे. या जोरदार तयारीत त्यांचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकही त्यांची मदत करताहेत.

कौतुकाची गोष्ट म्हणजे तिचा लग्नाचा लेहंगा प्रसिद्ध डिझायनर सब्यासाची डिझाईन करतोय.