धर्मशाला : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. या मॅचमध्ये विकेट कीपर वृद्धीमान सहानं धोनीला मागे टाकलं आहे. या मोसमामध्ये सहानं २६ बॅट्समनना आऊट केलं आहे. अशी कामगिरी करणारा सहा हा दुसरा भारतीय विकेट कीपर ठरला आहे.
यादवच्या बॉलिंगवर सहानं वॉर्नरचा कॅच पकडला तेव्हा त्यानं धोनीचं हे रेकॉर्ड तोडलं. यानंतर लगेचच सहानं पुन्हा एकदा यादवच्याच बॉलिंगवर रेनशॉला माघारी पाठवतं २६ विकेटचा विक्रम केला. याआधी धोनीनं २०१२-१३ या सीझनमध्ये २४ जणांना माघारी पाठवलं होतं. विकेट कीपरच्या या यादीमध्ये सय्यद किरमाणी यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. किरमाणी यांनी १९७९-८०मध्ये ३५ बॅट्समनना आऊट केलं होतं.