कुस्तीपटू साक्षी मलिक चढली बोहल्यावर

रिओ ऑलम्पिक सिल्वर मेडल विजेती साक्षी मलिक आणि सत्यव्रत कादियान नुकतेच लग्नबंधनात अडकले. नांदल भवन येथे संध्याकाळपासून सुरू झालेला हा कार्यक्रम उशीरा रात्रीपर्यंत चालू होता.

Intern Intern | Updated: Apr 3, 2017, 04:50 PM IST
कुस्तीपटू साक्षी मलिक चढली बोहल्यावर title=

मुंबई : रिओ ऑलम्पिक सिल्वर मेडल विजेती साक्षी मलिक आणि सत्यव्रत कादियान नुकतेच लग्नबंधनात अडकले. नांदल भवन येथे संध्याकाळपासून सुरू झालेला हा कार्यक्रम उशीरा रात्रीपर्यंत चालू होता.

या लग्नाला राजकारण, क्रिडा आणि सिनेजगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावून उभयंतास आशिर्वाद दिले. सेलिब्रिटींची हजेरी लागणार असल्याने शांतता आणि सुव्यवस्थेची पुरेपुर व्यवस्था करण्यात आली होती. 

मुख्य कौतुकाची गोष्ट म्हणजे या लग्नात सत्यव्रतने काहीच हुंडा घेतला नाही. तिकडच्या भागात लाखा-लाखांचा हुंडा दिला जात असताना त्याने  रिती-रिवाज म्हणून फक्त एक चांदीचे नाणे घेतले.

रोहतकच्या आपल्या घराजवळ संपुर्ण लग्नसमारंभ छान थाटात पार पडला. समारंभाची शान राजेशाहीच होती. विवाहीत दोघंही एकत्र खूप छान आणि आनंदी दिसत होते.