मास्टर ब्लास्टर सचिनच्या मराठमोळ्या शुभेच्छा

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जागतिक कीर्तीचा खेळाडू असला तरी आपल्या प्रथा परंपरा विसरलेला नाही.

Updated: Apr 8, 2016, 02:34 PM IST
मास्टर ब्लास्टर सचिनच्या मराठमोळ्या शुभेच्छा   title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जागतिक कीर्तीचा खेळाडू असला तरी आपल्या प्रथा परंपरा विसरलेला नाही. शुक्रवारी सचिन तेंडुलकरने त्याच्या सर्व चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. गुढी पाडवा म्हणजे मराठी माणसांचं नवीन वर्ष. म्हणूनच त्याने अगदी मराठीत ट्वीट करुन सर्वांना या मंगलमयी दिवसाच्या शुभेच्छा दिल्यायत. महाराष्ट्राप्रमाणेच आंध्र प्रदेशातही हा दिवस 'उगडी' या नावाने साजरा केला जातो. आंध्रवासीयांनाही त्याने शुभेच्छा दिल्या आहेत.

 

A very happy Gudi Padwa and Ugadi to one and all!

Posted by Sachin Tendulkar on 8 April 2016