मुंबई : क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर खेळाडू एकमेकांच्या खेळण्याबद्दल चर्चा करताना तुम्ही ऐकलंच असेल... आता या चर्चेत खेळाडुंच्या पत्नीही सामील झाल्यात.
पाकिस्तान टी-२० क्रिकेट टीमचा नवा कॅप्टन सरफराज याची पत्नी सैयदा खुशबख्त हिनं नुकतंच भारताच कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांच्याबद्दल असं काही वक्तव्य केलं की सगळ्यांच्याच नजरा आपसूकच सैयदाकडे वळल्यात.
महेंद्रसिंग धोनीबद्दल बोलताना सैयदानं म्हटलं, 'टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी क्रिकेटचा लिविंग लिजंड आहे. धोनीनं मैदानात लढाई करत भारताला अनेक पुरस्कार जिंकून दिलेत. माझ्या पतीनंही त्याच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकल्यात'.
धोनीची पत्नी साक्षीबद्दलही सैयदाचं स्वतंत्र मत आहे. 'धोनीची पत्नी साक्षी धोनी खुपच लोकप्रिय व्यक्ती आहे आणि माझ्या मनात तिच्याप्रती आदर आहे. ती धोनीसाठी लकी चार्म आहे. तिला मी भेटेल तेव्हा तिच्यासोबत काय बोलेल हे मलाही माहीत नाही' असं सैयदानं म्हटलंय.
'मला आशा आहे की मीदेखील माझ्या पती सरफराज अहमदसाठी तितकीच लकी राहील. तसं माझ्या नावाचा अर्थच आहे - चांगल्या नशिबाची मुलगी' अशी पुश्तीही सैयदानं जोडलीय.
शाहिद आफ्रिदीचा कॅप्टन पदावरून राजीनामा दिल्यानंतर विकेटकीपर - बॅटसमन सरफराजला पाकिस्तान टी-२० टीमचा कॅप्टन बनवण्यात आलंय. या जबाबदारीसाठी सरफराज तयार असल्याचंही सैयदानं म्हटलंय.