सचिनच्या 'प्लेइंग इट माय वे' आत्मचरित्राचे आज प्रकाशन

मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या 'प्लेइंग इट माय वे'  (Playing It My Way) या आत्मचरित्राचे आज प्रकाशन करण्यात येणार आहे. हे पुस्तक प्रकाशनापूर्वीच चर्चेत आले आहे. भारतीय संघाचे कोच ग्रेग चॅपेल यांच्या वादग्रस्त निर्णयाचा खुलासा सचिनने केल्यानंतर चॅपेल यांच्यावर टीका होऊ लागली. चॅपेल हे रिंगमास्टरप्रमाणे वागत असल्याचे या पुस्तकात नमुद केले आहे. त्यामुले या पुस्तकाविषयी उत्सुकता आहे.

Updated: Nov 5, 2014, 11:40 AM IST
सचिनच्या 'प्लेइंग इट माय वे'  आत्मचरित्राचे आज प्रकाशन title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या 'प्लेइंग इट माय वे' (Playing It My Way) या आत्मचरित्राचे आज प्रकाशन करण्यात येणार आहे. हे पुस्तक प्रकाशनापूर्वीच चर्चेत आले आहे. भारतीय संघाचे कोच ग्रेग चॅपेल यांच्या वादग्रस्त निर्णयाचा खुलासा सचिनने केल्यानंतर चॅपेल यांच्यावर टीका होऊ लागली. चॅपेल हे रिंगमास्टरप्रमाणे वागत असल्याचे या पुस्तकात नमुद केले आहे. त्यामुले या पुस्तकाविषयी उत्सुकता आहे.

क्रिकेटच्या पीचवर एकाहून एक रेकॉर्ड करणारा विक्रमादित्य भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या आत्मचरित्रावरून सध्या नव्या वादाला तोंड फुटलंय. भारतीय क्रिकेट टीमचे माजी प्रशिक्षक ग्रॅग चॅपल हे रिंगमास्टरसारखे वागत होते. २००७ च्या वर्ल्ड कपच्या आधी राहुल द्रवीडला कप्तानपदावरून हटवण्याचा चॅपल यांचा डाव होता, असा गौप्यस्फोट सचिननं आपल्या आत्मचरित्रात केलाय.

दरम्यान, सचिनच्या या विधानाला भारतीय क्रिकेटपटू हरभजनसिंगनं पुष्टी दिलीय. तर राहुल द्रविडनं याबाबत सेफ प्रतिक्रिया व्यक्त केलीय. सचिनचे झहीर खान आणि हरभजनसिंग यांनी समर्थन केले आहे. तर ग्रेग चॅपेल यांनी राहुल द्रविडला कर्णधारपदावरून हटविण्याबाबतचा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, मी पुस्तक वाचल्यानंतर मला वाटल्यास मत व्यक्त करेन, अशी सावध प्रतिक्रिया राहुल द्रविड यांनी दिलेय.

सचिन आणि चॅपेल यांच्यात नेमके काय बोलणे झाले हे मला माहीत नाही. त्यांची ही खासगी चर्चा होती. त्यावर मी काही बोलणे योग्य होणार नाही. मी काही पुस्तक वाचलेले नाही. त्याआधी प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे द्रविड यांने म्हटलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.