मुंबई : सचिनचे झहीर खान आणि हरभजनसिंग यांनी समर्थन केले आहे. तर ग्रेग चॅपेल यांनी राहुल द्रविडला कर्णधारपदावरून हटविण्याबाबतचा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, मी पुस्तक वाचल्यानंतर मला वाटल्यास मत व्यक्त करेन, अशी सावध प्रतिक्रिया राहुल द्रविड यांनी दिलेय.
सचिन आणि चॅपेल यांच्यात नेमके काय बोलणे झाले हे मला माहीत नाही. त्यांची ही खासगी चर्चा होती. त्यावर मी काही बोलणे योग्य होणार नाही. मी काही पुस्तक वाचलेले नाही. त्याआधी प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे द्रविड यांने म्हटलेय.
क्रिकेटच्या पीचवर एकाहून एक रेकॉर्ड करणारा विक्रमादित्य भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या आत्मचरित्रावरून सध्या नव्या वादाला तोंड फुटलंय. भारतीय क्रिकेट टीमचे माजी प्रशिक्षक ग्रॅग चॅपल हे रिंगमास्टरसारखे वागत होते. २००७ च्या वर्ल्ड कपच्या आधी राहुल द्रवीडला कप्तानपदावरून हटवण्याचा चॅपल यांचा डाव होता, असा गौप्यस्फोट सचिननं आपल्या आत्मचरित्रात केलाय.
येत्या ६ नोव्हेंबरला सचिनचं 'प्लेइंग इट माय वे' नावाचं आत्मचरित्र प्रसिद्ध होणाराय. दरम्यान, सचिनच्या या विधानाला भारतीय क्रिकेटपटू हरभजनसिंगनं पुष्टी दिलीय. तर राहुल द्रविडनं याबाबत सेफ प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.