मुंबई : बीसीसीआयमध्ये भारतीय क्रिकेटमधील तीन मोठ्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची आता नवी इनिंग सुरु होणार आहे. या तिघांचीही बीसीसीआयच्या सल्लागार समितीत एन्ट्री घेतलीय. क्रिकेटशी निगडीत मुद्द्यांवर हे तिघही जण सल्ला देणार आहेत. या तिघांची आता बीसीसीआयमध्ये एंट्री झाल्यानं भारतीय क्रिकेटचा चेहरा आता बलदणार अशी आशा व्यक्त केली जातेय.
बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी ट्विटरवरून ही गोष्ट जाहीर केलीय.
तेंडुलकरनं २०० टेस्ट (१५९२१ रन्स) आणि ४६३ वन डे (१८४२६ रन्स) खेळल्यात. त्यानं नोव्हेंबर २०१३ मध्ये क्रिकेटला रामराम ठोकला होता.
Gr8 start to the day! Conference call w/ legends @sachin_rt @VVSLaxman281 & Saurav Ganguly who will form @BCCI Cricket Advisory Committee.
— Anurag Thakur (@ianuragthakur) June 1, 2015
गांगुलीनं ११३ टेस्ट आणइ ३११ वनडे खेळल्यात. दादाच्याच नेतृत्वाखाली टीम इंडिया २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत दाखल झाली होती. तर लक्ष्मणनं १३४ टेस्ट आणि ८६ वनडे खेळल्यात.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकूर आणि बोर्डाचे अध्यक्ष जगमोहन दालमिया क्रिकेटसंबंधी निर्णयांत या पॅनलचाही सल्ला घेतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.