रोहित - धवननं वाढवलंय धोनीचं टेन्शन...

टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची ओपनिंग जोडी सुपर फ्लॉप ठरली आहे. सलामीच्या न्यूझीलंडविरुद्धच्या आणि पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्येही रोहित-धवन ही जोडी आपली छाप सोडू शकलेली नाही. या दोघांचा ढासळता फॉर्म सध्या कॅप्टन धोनीच्या चिंतेचा विषय बनलाय.

Updated: Mar 23, 2016, 08:36 AM IST
रोहित - धवननं वाढवलंय धोनीचं टेन्शन...  title=

मुंबई : टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची ओपनिंग जोडी सुपर फ्लॉप ठरली आहे. सलामीच्या न्यूझीलंडविरुद्धच्या आणि पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्येही रोहित-धवन ही जोडी आपली छाप सोडू शकलेली नाही. या दोघांचा ढासळता फॉर्म सध्या कॅप्टन धोनीच्या चिंतेचा विषय बनलाय.

स्कोअर बोर्डवर रन्स उभारण्यासाठी आणि लक्ष्याचा पाठलाग करताना नेहमी ओपनिंग जोडी कशी सुरुवात करून देते यावर त्या टीमचं भवितव्य अवलंबून असतं. सध्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमचे ओपनर्स अपयशी ठरल्यानं धोनीची डोकोदुखी वाढली आहे. टीम इंडियाची बॅटिंग लाईन अप सेटल आहे. त्यामुळे धोनी टीम कॉम्बिनेशनमध्ये फारसे बदल करायला तयार नसतो. मात्र, नजीकच्या काळात रोहित शर्मा आणि शिखर धवन या बिन्नीच्या जोडीचा फॉर्म पाहता आता टीम इंडियात बदल करण्याची वेळ आहे. 

अजिंक्य रहाणेचा पर्याय धोनीकडे आहे. त्यानं नेटमध्ये चांगलाच घामही गाळलाय. त्यामुळे कदाचित धोनी त्याला टीममध्ये स्थान देऊ शकतो. वॉर्म-अप मॅचमध्ये रोहितनं आपला फॉर्म सिद्ध केला होता. मात्र, न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्ध त्याची बॅट शांतच होती. शिखर धवनलाही लौकीकाला साजेशी कमागिरी करता आलेली नाही. त्याच्या सातत्याबाबत आणि टेक्निकबाबत कायमच प्रश्न उपस्थित होतात. घरच्या मैदानावर या दोघांचा ढासळता फॉर्म भारतीय टीम मॅनेजमेंटच्या चिंतेत भर पाडतोय.
 
न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतीय ओपनर्सच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या... रोहित शर्मा आणि शिखर धवनची जोडी टीम इंडिासाठी केवळ ५ रन्सची ओपनिंगच देऊ शकली. तर पाकिस्ताविरुद्धच्या मॅचमध्येही परिस्थिती काही वेगळी नव्हती. या दोघांना १४ रन्सची ओपनिंग देण्यातच यश आलं होतं.

ओपनिंगला तर हे दोघ जण अपयशी ठरलेत. त्याचप्रमाणे धवन-रोहितचा वैयक्तिक फॉर्मही चांगला नाही. दोघांनाही प्रतिस्पर्धी बॉलर्ससमोर मैदानावर तग धरता आलेला नाही. 

रोहित शर्माला २ मॅचेसमध्ये ७.५०च्या सरासरीनं फक्त १५ रन्स करता आल्यात. यात त्याचा सर्वोत्तम स्कोअर १० रन्स होता. तर शिखर धवनला दोन मॅचेसमध्ये ७ रन्सच करता आलेत.

दोन्ही ओपनर्स अपयशी ठरत असल्यानं सगळा दबाव हा मिडल ऑर्डवर पडतोय. विराट कोहली, युवराज सिंग आणि कॅप्टन धोनीचा फॉर्म चांगला आहे. मात्र, आगामी काळात जर टीम इंडियाला मोठा स्कोअर उभारायचा असेल तर रोहित आणि धवनचं फॉर्ममध्ये परत येणं आवश्यक आहे.