ब्रिसबेन : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डेमध्ये पराभव पत्करल्यानंतर उद्याच्या दुसऱ्या मॅचसाठी टीम इंडियानं कसून सराव केला. जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच पिचवर पराभूत करणं किती अवघड आहे, याची कल्पना धोनी ब्रिगेडला पहिल्याच मॅचमध्ये आली आहे.
ब्रिसबेनमध्ये होणाऱ्या या सामन्यात पर्थच्या चुका टाळण्यावर टीमचा भर असेल. त्यासाठीच संघानं मैदानात घाम गाळला. पहिल्या वन-डेमध्ये नाबाद १७१ रन्सची खेळी करणाऱ्या रोहित शर्मानंही नेमकं याच गोष्टीवर बोट ठेवलंय. नुसतं टॅलेंट असून उपयोग नाही, तर त्याचा योग्य वापर करता यायला हवा असं रोहित म्हणाला.