धवन-शिखरने रचला इतिहास, मोडला ५ वर्षांचा रेकॉर्ड

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा(६०)आणि शिखर धवन (४२) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नच्या मैदानावर सर्वाधिक भागीदारी रचण्याच नवा रेकॉर्ड बनवलाय. 

Updated: Jan 29, 2016, 04:27 PM IST
धवन-शिखरने रचला इतिहास, मोडला ५ वर्षांचा रेकॉर्ड title=

मेलबर्न : भारताचा सलामीवीर रोहित शर्मा(६०)आणि शिखर धवन (४२) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नच्या मैदानावर सर्वाधिक भागीदारी रचण्याच नवा रेकॉर्ड बनवलाय. या दोघांनी मिळून तब्बल ९७ धावांची भागीदारी केली. 

रोहित आणि धवनच्या नावे आता एमसीजीच्या मैदानावर सर्वाधिक धावांची भागीदारी केल्याची नोंद झालीये. यापूर्वी १४ जानेवारी २०११ मध्ये इग्लंडचा इयान बेल आणि स्टीव्ह डेविस यांनी या मैदानावर ६० धावांची भागीदारी केली होती. धवन-रोहितने त्यांचा हा रेकॉर्ड तोडलाय. 

धवनने जेम्स फॉकनरच्या चेंडूवर साव्या षटकांतील पाचव्या चेंडूवर एक धाव घेत ६१ धावांची भागीदारी केली आणि नवा इतिहास रचला. धवन ४२ धावांवर बाद झाल्यानेही जोडी फुटली. धवन बाद झाल्यानंतर रोहितही ६० धावांवर बाद झाला.