कुस्तीपटू साक्षी मलिक यंदा बोहल्यावर?

रिओ ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर कुस्तीपटू साक्षी मलिकने भारताला रिओमध्ये कांस्यपदक मिळवून दिले. 

Updated: Aug 28, 2016, 09:58 AM IST
कुस्तीपटू साक्षी मलिक यंदा बोहल्यावर? title=

मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर कुस्तीपटू साक्षी मलिकने भारताला रिओमध्ये कांस्यपदक मिळवून दिले. 

रिओमध्ये मोठे यश मिळवल्यानंतर आता कुस्तीपटू साक्षी लवकरच बोहल्यावरही चढणार असल्याची चर्चा आहे. आनंदबझार पत्रिका या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत साक्षीने हे सांगितलेय. 

साक्षीचा होणारा जोडीदार कोण असेल हे मात्र तिने गुपित ठेवलंय. तो मला खूप सपोर्ट करतो. माझी स्वप्ने ही त्याची स्वप्ने आहेत. लग्नानंतरही तो माझा चांगला मित्र असेल. रिओ ऑलिम्पिकसाठी तयारी करतानाही त्याने मला मदत केली. लग्नानंतरही कुस्तीमध्ये कोणतीही बाधा येणार नाही याची मला खात्री आहे, असे साक्षीने या मुलाखतीदरम्यान सांगितले. 

साक्षीने रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. कांस्यपदकाच्या लढतीत तिने तिच्या प्रतिस्पर्धीला नमवत पहिल्यावहिल्या पदकावर कब्जा केला.