'धोनीकडून कोहलीला कर्णधार सोपवण्याची योग्य वेळ'

 टीम इंडियाच्या निवड समितीचा मी अध्यक्ष असतो, तर मी विराट कोहलीला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कॅप्टन निवडले असते, असे बीसीसीआयचे माजी व्यवस्थापक आणि क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.

Updated: May 31, 2016, 06:40 PM IST
'धोनीकडून कोहलीला कर्णधार सोपवण्याची योग्य वेळ'  title=

मुंबई :  टीम इंडियाच्या निवड समितीचा मी अध्यक्ष असतो, तर मी विराट कोहलीला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कॅप्टन निवडले असते, असे बीसीसीआयचे माजी व्यवस्थापक आणि क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.

महेंद्रसिंह धोनीने डिसेंबर २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, यानंतर कोहलीला कसोटी संघाचा कर्णधार बनविण्यात आले होते. आता एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद धोनीकडे आहे, याविषयी अनेकदा रवी शास्त्री हे विराट कोहलीकडे झुकताना दिसत होते.

रवी शास्त्री म्हणाले, मी आता निवड समितीचा अध्यक्ष असतो तर, त्याला कर्णधारपद दिले असते. महेंद्रसिंह धोनीने खेळाचा आनंद घ्यावा. धोनीने कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळावे. धोनी खेळाडू म्हणून चांगली कामगिरी करत आहे. माझ्यामते हा निर्णय घेणे थोडे अवघड असले तरी, पण योग्य आहे.