मुंबई इंडियन्स फायनलमध्ये, कोलकत्याला केले पराभूत

 आयपीएल १०च्या दुसऱ्या क्वॉलीफायरमध्ये मुंबई इंडियन्सने कोलकता नाईट रायडर्सला सहा विकेटने पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये मुंबईचा सामना पुण्याशी होणार आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 19, 2017, 11:11 PM IST
मुंबई इंडियन्स फायनलमध्ये, कोलकत्याला केले पराभूत  title=

मुंबई :  आयपीएल १०च्या दुसऱ्या क्वॉलीफायरमध्ये मुंबई इंडियन्सने कोलकता नाईट रायडर्सला सहा विकेटने पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये मुंबईचा सामना पुण्याशी होणार आहे. 

मुंबईने कोलकत्याच्या १०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना क्रुणाल पांड्या याने शानदार ३० चेंडूत नाबाद ४५ धावांची खेळी करत सामना खिशात घातला. 
त्याला रोहित शर्माने २६ धावा करून चांगली साथ दिली. 

यापूर्वी पहिल्या डावात मुंबईकडून शानदार गोलंदाजी करताना कर्ण शर्मा याने चार विकेट पटकावल्या. तर जसप्रीत बुमरा याने तीन आणि मिचल जॉन्सन याने दोन विकेट घेतल्या. 

कोलकताकडून इशांत जग्गी याने २८ आणि सुर्यकांत यादव याने सर्वाधिक ३१ धावा केल्या. 

मागील सामन्यात पुण्याकडून पराभूत झाल्यावर मुंबईने चांगली कामगिरी करत कोलकत्याला १०७ धावांत रोखले आहे. आता मुंबई इंडियन्स  २१ तारखेला पुण्याविरूद्ध हैदराबादमध्ये फायनल खेळणार आहे.