'त्या' खेळीआधी धोनीने युवराजला दिले होते हे वचन

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सिक्सर किंग युवराज सिंग यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्रीमुळे भारताला विजय साकारता आला. 

Updated: Jan 20, 2017, 08:17 AM IST
'त्या' खेळीआधी धोनीने युवराजला दिले होते हे वचन title=

कटक : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सिक्सर किंग युवराज सिंग यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्रीमुळे भारताला विजय साकारता आला. 

या सामन्यात युवराजने दीडशतकी खेळी साकारली तर धोनीने दमदार शतक झळकावले. या खेळीपूर्वी धोनीने युवराजला एक वचन दिले होते ते वचन त्याने या सामन्यात पूर्ण करुन दाखवले. 

काही दिवसांपूर्वीच युवराजने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात धोनीने युवराजला असे वचन दिले होते की मला षटकार मारण्याची संधी मिळाली तर ते मारत राहीन. 

या व्हिडीओनंतर धोनीने गुरुवारच्याच सामन्यात हे करुन दाखवले. २००हून अधिक षटकार ठोकणारा धोनी पहिला भारतीय क्रिकेटर ठरला.