कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा नवा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेच्या टॉससाठी उतरताच भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नवा विक्रम प्रस्थापित केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉर्मटमध्ये मिळून ३०० सामन्यांचे नेतृत्व करणारा धोनी तिसरा कर्णधार बनलाय. 

Updated: Jan 17, 2016, 03:24 PM IST
कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा नवा विक्रम title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेच्या टॉससाठी उतरताच भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नवा विक्रम प्रस्थापित केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉर्मटमध्ये मिळून ३०० सामन्यांचे नेतृत्व करणारा धोनी तिसरा कर्णधार बनलाय. 

 

या मालिकेतील तिसरी वनडे ही धोनीची १८९वा सामना आहे. धोनीने ६० कसोटीत संघाचे नेतृत्व केले होते. तर ५१ टी-२०मध्ये आतापर्यंत नेतृत्व केलेय. 

 

या यादीत ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग (३२४) अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंग(३०३)चा नंबर लागतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत धोनी फ्लेमिंगचाही विक्रम मोडेल. 

 

२०१४मध्ये धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीच्या नेतृत्वाखालील भारताने एकूण ६० कसोटी सामने खेळलेत. यात २७ सामन्यात विजय, १८ सामन्यात पराभव तर १५ सामने अनिर्णीत राहिले. १८९ वनडेपैकी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत १०३ वनडे जिंकल्यात.