दुखापतीमुळे शमी IPLमधून बाहेर, दिल्लीला झटका

भारताचा स्टार फास्ट बॉलर मोहम्मद शमी गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएल टुर्नामेंटमधून बाहेर झाला आहे. वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा शमी आयपीएलमध्ये 'दिल्ली डेअरडेविल्स' टीमकड़ून खेळतो. 

Updated: Apr 16, 2015, 05:46 PM IST
दुखापतीमुळे शमी IPLमधून बाहेर, दिल्लीला झटका title=

मुंबई : भारताचा स्टार फास्ट बॉलर मोहम्मद शमी गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएल टुर्नामेंटमधून बाहेर झाला आहे. वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा शमी आयपीएलमध्ये 'दिल्ली डेअरडेविल्स' टीमकड़ून खेळतो. 

वर्ल्ड कपमध्ये शमीने भारताकडून सर्वात जास्त १८ विकेट घेतल्या होत्या. वर्ल्ड कपमध्ये युएईच्या मॅचविरूध्द शमीला आराम देऊन भुवनेश्वर कुमारला खेळवलं होतं. कदाचित तेव्हाच शमीचा गुढघा दुखापतग्रस्त असावा.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'शमी आयपीएलमधून बाहेर झाला आहे. कदाचित त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्याला ठीक होण्यास किमान दोन महिने लागतील.' 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.