...जेव्हा संघकारासमोर गुडघ्यांवर झुकला श्रीलंकन कॅप्टन!

श्रीलंकन कॅप्टन एन्जेलो मॅथ्यूज यानं आपण गुडघ्यावर बसून कुमार संघकाराला वर्ल्डकपनंतरही क्रिकेटमधून निवृत्ती न घेण्याची विनवणी केलीय, असं म्हटलंय.

Updated: Mar 12, 2015, 09:33 AM IST
...जेव्हा संघकारासमोर गुडघ्यांवर झुकला श्रीलंकन कॅप्टन! title=

होबार्ड : श्रीलंकन कॅप्टन एन्जेलो मॅथ्यूज यानं आपण गुडघ्यावर बसून कुमार संघकाराला वर्ल्डकपनंतरही क्रिकेटमधून निवृत्ती न घेण्याची विनवणी केलीय, असं म्हटलंय.

'मी माझ्या गुडघ्यांवर झुकलो होतो आणि कुमारला निवृत्ती न घेण्याबद्दल आग्रह करत होतो. परंतु, आपल्याला त्याच्या इच्छेचा आदर करावाच लागणार आहे. कारण, देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण नेहमीच कृतज्ञ राहिलो आहोत' असं मॅथ्युजनं म्हटलंय. 

बुधवारी स्कॉटलंडला १४८ रन्सनं मात दिल्यानंतर श्रीलंकान कॅप्टन मॅथ्युज म्हणाला 'खेळाडुंनी खरंच खूप चांगला खेळ केलाय. या विजयाचं श्रेय दिलशान आणि संघकाराला दिलं गेलं पाहिजे. त्यांचा खेळ वयाबरोबर निखरत जातोय'.

कुमार संघकारानं बुधवारी रेकॉर्डसची एकच बरसात केली. ३७ वर्षीय कुमार संघाकारानं ४०३ वन डे मॅचमध्ये १४ हजारांहून जास्त रन्स केलेत. बुधवारी स्कॉटलंडविरुद्ध शतक ठोकून कोणत्याही वनडे टुर्नामेंटमध्ये सलग चार मॅचेसमध्ये शतक ठोकणारा तो पहिला बॅटसमन बनलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.