नवी दिल्ली : मनीष पांडेच्या ८१ चेंडूत नाबाद १०४ आणि रोहित शर्माच्या ९९ धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची अखेरची वनडे जिंकत व्हाईटवॉश टाळला. भारताच्या विजयाचा खरा हिरो ठरला तो मनीष पांडे. त्याने जबरदस्त खेळ करताना या मालिकेत भारताला पहिल्या विजयाचे दर्शन घडवले. अखेरच्या षटकांत भारताला जिंकण्यासाठी १३ धावा ह्व्या होत्या.
असा मिळाला भारताला विजय
विजयासाठी ६ चेंडूत १३ धावा. मिशेल मार्श गोलंदाजी करत होता
वाईड बॉलने ओव्हरची सुरुवात
पहिला चेंडू - महेंद्रसिंग धोनीचा जबरदस्त सिक्स
दुसरा चेंडू - महेंद्र सिंग धोनी आउट
तिसरा चेंडू - मनीष पांडेचा चौकार. वनडे कारकिर्दीतील पहिले शतक
चौथा चेंडू - दोन धावा घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब
आयपीएलमध्ये पहिले शतक ठोकणारा मनीष पहिला भारतीय फलंदाज
आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाला शतक ठोकता आले नव्हते. मात्र दुसऱ्या सीजनमध्ये मनीषनेही ही कमाल केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून खेळताना त्याने नाबाद ११४ धावांची खेळी केली.