विराट-अनुष्काने इन्स्टाग्रामवर केलं एकमेकांना अनफॉलो

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील लव्ह अफेयरर्सबाबतच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. 

Updated: Jan 30, 2016, 12:12 PM IST
विराट-अनुष्काने इन्स्टाग्रामवर केलं एकमेकांना अनफॉलो title=

मुंबई : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील लव्ह अफेयरर्सबाबतच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. 

मात्र तुम्हाला हे माहीत आहे का? रियल लाईफमध्ये हे लव्ह कपल सोशल साइट इन्टाग्रामवर एकमेकांना फॉलोही करत नाही. हाच विषय सध्या त्यांच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय बनलाय. 

खरंतर एका फॅनने विराट आणि अनुष्का इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत नसल्याचे ट्विट केले होते. मग काय बघता बघता हे ट्विट अनेकांनी रिट्वीट केले तसेच अनुष्का आणि विराटकडून उत्तरही मागितले. मात्र अद्याप विराट अथवा अनुष्का या दोघांकडूनही कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.