महेंद्रसिंग धोनी बाबा झाला, कन्या रत्नाचा लाभ

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या घरी नन्ही परी दाखल झाल्याने घरात आनंदी वातापरण आहे. माही आणि साक्षीला कन्यारत्नाचा लाभ झालाय.

Updated: Feb 6, 2015, 11:52 PM IST
महेंद्रसिंग धोनी बाबा झाला, कन्या रत्नाचा लाभ title=

रांची : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या घरी नन्ही परी दाखल झाल्याने घरात आनंदी वातापरण आहे. माही आणि साक्षीला कन्यारत्नाचा लाभ झालाय.

रांचीमध्ये माहीच्या धर्मपत्नीने गुडगावमधल्या खासगी रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. या छोट्याशा नन्हीपरीचे वजन ३.७ किलो असून बाळाची आई सुखरुप आहे.

 ३३ वर्षीय माही बाबा झाल्याने घरात खुशीचा माहोल आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी आपली पत्नी साक्षी आणि मुलीला भेटण्यासाठी एकदोन दिवसांसाठी भारतात परतण्याची शक्यता आहे.धोनी सध्या ऑस्ट्रेलियात आहे.

धोनी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्व कपसाठी बिझी आहे. धोनीचा विवाह ४ जुलै २०१० रोजी लहानपणीची मैत्रीण साक्षी सिंह रावत हिच्याशी झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.