T20 WC जिंकताच सुनील गावस्कर यांची मोठी मागणी, म्हणाले 'या' दिग्गजाला भारतरत्न द्या

Sunil Gavaskar On Rahul Dravid : टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या हेड कोच राहुल द्रविडला भारतरत्न (Bharat Ratna) दिला जावा, अशी मागणी सुनील गावस्कर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jul 7, 2024, 04:42 PM IST
T20 WC जिंकताच सुनील गावस्कर यांची मोठी मागणी, म्हणाले 'या' दिग्गजाला भारतरत्न द्या title=
Sunil Gavaskar Demand Bharat Ratna To Rahul Dravid

Sunil Gavaskar Demand Bharat Ratna To Rahul Dravid : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर आता टीम इंडियाचं (Team india) क्रिडाविश्वात कौतूक होताना दिसतंय. कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा या तीन खेळाडूंसाठी हा अखेरचा सामना होता. तर हेड कोच म्हणून काम करणाऱ्या राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ देखील संपला आहे. अशातच आता टीम इंडियाचे माजी स्टार सलामीवीर फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मोठं वक्तव्य केलंय. राहुल द्रविड यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी सुनील गावस्कर यांनी केलीये.

सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या कामगिरीवर सातत्याने आपली भूमिका मांडली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्याने गावस्कर यांनी आनंद व्यक्त केला होता. अशातच आता मिड डेला लिहिलेल्या लेखामध्ये सुनील गावस्कर यांनी राहुल द्रविड यांना भारतरत्नने सन्मानित करावं, अशी मागणी केली आहे. त्यावेळी त्यांनी राहुल द्रविड यांचं कौतूक देखील केलं.

काय म्हणाले सुनील गावस्कर?

राहुल द्रविड यांचं भारतीय क्रिकेटमध्ये त्याचं मोठं योगदान आहे. द्रविडने एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून टीम इंडियाला खूप काही दिलं आहे. द्रविडने आपल्या कोचिंगमध्ये नवे खेळाडू तयार केले, तर खेळताना अनेक कठीण सामनेही संघाला जिंकून दिले. एकही सामना जिंकणं कठीण असताना कर्णधार म्हणून द्रविडने परदेशी भूमीवर मालिका जिंकली, याची आठवण सर्वांना असावी, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. राहुल द्रविडला भारतरत्न देण्याची सरकारसाठी हीच योग्य वेळ आहे, असंही सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.

राहुल द्रविड यांनी काय म्हटलं होतं?

मला टीममध्ये सातत्य राखायला आवडतं. मला संघात खूप जणांना वगळणं आणि बदल करणं आवडत नाही. कारण मला विश्वास आहे, यामुळे संघात खूप अस्थिरता निर्माण होते. त्याशिवाय फार चांगल वातावरण राहत नाही, असं राहुल द्रविड यांनी म्हटलं होतं. माझ्या कारकीर्दीत मी अर्धा डझन कॅप्टनसोबत काम केलं. एकूण 6 कर्णधारांसोबत काम करावं लागंल असं कधीच वाटलं नव्हतं. रोहितसोबत काम करताना मला खूप आनंद झाला. मी त्याला एक व्यक्ती आणि कर्णधार म्हणून परिपक्व होताना पाहिलं. संघाप्रती त्याची बांधिलकी आणि खेळाडूंबद्दलची त्याची काळजी घेणारी वृत्ती मला खूप आवडली. त्याने संघात असं वातावरण निर्माण केलं की सर्वांना सुरक्षित वाटतं, असं राहुल द्रविड म्हणाले आहेत.