नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गुरुनाथ मयप्पन, राज कुंद्रा, स्टुअर्ट बिन्नी, सुंदर रमन आणि श्रीनिवासन यांची नावे पुढे आली आहेत.
यांच्या भूमिकेबाबत न्यायलयात चर्चा झाली नाही. मात्र, माजी न्यायाधीश मुकुल मुदगल समितीचा पहिला अहवाल बंद लिफाफ्यात होता. तो खोलल्यानंतर या पाच जणांची नावे समोर आलीत. याबाबतची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयची निवडणूक चार आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.
याप्रकरणी यांची काय भूमिका आहे, याबाबात कोणतीही चर्चा न्यायालयात झालेली नाही. या अहवालाची प्रत बीसीसीआय, खेळाडू आणि श्रीनिवासन यांना देण्यात येणार आहे. या अहवालात खेळाडूंची काय भूमिका होती, हेही स्पष्ट करण्यात आलेले नाही.
याप्रकरणी चौकशी करणाऱ्या माजी न्यायाधीश मुकुल मुगदल यांच्या अध्यक्षतेखालीले तीन जणांच्या समितीने ३ नोव्हेंबरला आपला सीलबंद अहवाल सादर केला होता. ३० पानी हा अहवाल आहे. या अहवालात कोणाचे नाव दिलेले नाही तर कोडचा वापर करण्यात आलेला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.