मोहालीत आज कोण घेणार आघाडी?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा सामना आज मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. 

Updated: Oct 23, 2016, 07:55 AM IST
मोहालीत आज कोण घेणार आघाडी? title=

मोहाली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा सामना आज मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. 

पाच सामन्यांच्या मालिकेत भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे मोहालीतीली तिसरा सामना जिंकत दोन्ही संघ आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.

पहिला वनडे सामना भारताने सहजरित्या जिंकला. त्यानंतर दुसरा सामना मात्र चुरशीचा झाला. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली आणि 1-1 अशी बरोबरी साधली. मोठे फटके मारण्याच्या नादात भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात झटपट विकेट गमावल्या. त्यामुळे भारतीय संघाला फलंदाजीवर मेहनत घेणे गरजेचे आहे. 

सामन्याची वेळ : दुपारी दीड वाजता.