विराट कोहली सांगतोय, तो ओपनिंगला का आला?

 कोहली या सामन्यात २९ धावा करून बाद झाला होता. विराट कोहलीचा हा निर्णय भारतासाठी महत्वाचा ठरला नाही. इंग्लंडने सात विकेट्स आणि ११ चेंडू राखून विजय मिळवला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 27, 2017, 12:05 PM IST
विराट कोहली सांगतोय, तो ओपनिंगला का आला? title=

कानपूर :  मी ओपनिंगला का आलो, हे टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने सांगितलं आहे. कोहली या सामन्यात २९ धावा करून बाद झाला होता. विराट कोहलीचा हा निर्णय भारतासाठी महत्वाचा ठरला नाही. इंग्लंडने सात विकेट्स आणि ११ चेंडू राखून विजय मिळवला.

कोहली ओपनिंगला का आला याच्यावर तो म्हणाला आहे, 'शिखर धवन फॉर्मात नव्हता, तर के राहुलची कामगिरीत अजुनही फारशी सुधारणा नाही. मी आयपीएलमध्ये डावाची सुरुवात केली आहे. आयपीएल टी-20 क्रिकेट आहे. याबाबत मला माहित आहे, त्यामुळे मी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरलो. तिथे खास दिसण्यासाठी नाही. माझ्या ओपनिंगमुळे संघाला अतिरिक्त संतुलन मिळतं.'  

'टी-20 आणि विशेषत: आयपीएलमध्ये मी अनेकदा सलामीला आलो आहे. माझ्यासाठी ही नवी गोष्ट नव्हती. अनेक वेळा सलामीची भागीदारी मजबूत होत नाही, तेव्हा आम्ही दुसऱ्या संघातून सलामीवीर आणू शकत नाही. आमच्यापैकीच कोणाला तरी ओपनिंगची जबाबदारी स्वीकारायला हवी.'