भारताला सेमी फायनलचा 'मौका मौका'

बांगलादेशने इंग्लडला नमवून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. आता त्यांचा सामना क्वार्टर फायनलमध्ये भारताशी होण्याची शक्यता आहे. 

Updated: Mar 9, 2015, 05:48 PM IST
भारताला सेमी फायनलचा 'मौका मौका' title=

अॅडलेड : बांगलादेशने इंग्लडला नमवून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. आता त्यांचा सामना क्वार्टर फायनलमध्ये भारताशी होण्याची शक्यता आहे. 

भारताला क्वार्टर फायनलमध्ये इंग्लड ऐवजी बांगलादेश आल्याने अधिक आनंद झाला आहे. त्यामुळे भारताला सेमी फायनलमध्ये जाण्याचा मौका मिळाला आहे. भारताने वर्ल्ड कप पूर्वी झालेल्या तिरंगी मालिकेत इंग्लडकडून सपाटून मार खाल्ला होता. त्यामुळे इंग्लड क्वार्टर फायनलला नाही ही भारतासाठी जमेची बाजू ठरली आहे. 

भारताने आपल्या दोन पैकी दोन किंवा एक सामना जिंकला तर भारत बी ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकाचा संघ होईल. भारताचा उद्याचा सामना आयर्लंडसोबत आहे. तसेच १४ मार्च रोजी झिम्बावेशी अखेरचा सामना आहे. त्यामुळ दोन्ही सामने तुलनेने सोप्पे आहेत. 

तसेच बांगलादेशचे ७ गुण असून त्यांचा पुढील आपला सामना न्यूझीलंडशी आहे. न्यूझीलंड ५ सामने जिंकून ए ग्रुपमध्ये अजिंक्य आहे. त्यामुळे ते सहाव्या सामन्यातही विजय मिळवून अजिंक्य राहण्याचा प्रयत्न करीत. तसेच ऑस्ट्रेलियाचे आता ७ गुण असून त्यांचा पुढील सामना स्कॉटलंडशी आहे. त्यामुळे ते हा सामना जिंकून ९ गुण करीत असा अंदाज आहे. 

या सर्व वरील शक्यता तंतोतंत योग्य ठरल्यास भारत आणि बांगलादेश असा क्वार्टर फायनलचा २१ मार्च रोजी वेलिंग्टन येथे होण्याची शक्यता आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.