पहिली टेस्ट जिंकण्यासाठी भारताला हव्या 6 विकेट्स

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Updated: Sep 25, 2016, 05:43 PM IST
पहिली टेस्ट जिंकण्यासाठी भारताला हव्या 6 विकेट्स  title=

कानपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडनं 4 विकेटच्या मोबदल्यात 93 रन केल्या होत्या. अश्विननं न्यूझीलंडच्या तीन विकेट घेतल्या तर रॉस टेलर रन आऊट झाला.

विजयासाठी 434 रनचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. स्कोअरबोर्डवर फक्त तीन रन असताना न्यूझीलंडचे दोन बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर केन विलियमसन आणि रॉस टेलरनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण तेही बाद झाले. चौथ्या दिवसा अखेरीस रॉन्ची 38 रनवर तर सॅन्टनर 8 रनवर खेळत आहे.

चौथ्या दिवसाची सुरुवात 159 रनवर एक विकेट अशी करणाऱ्या भारतानं दुसरी इनिंग 377 रनवर घोषीत केली. भारताकडून विजयनं 76, पुजारानं 78, रोहित शर्मानं नाबाद 68 आणि जडेजानं नाबाद 50 रन केल्या.