डिसेंबर महिन्यात भारत-पाक सीरिजसाठी बीसीसीआय तयार, पण...

भारत - पाकिस्तान संबंध लक्षात घेता दोन्ही देशांदरम्यान डिसेंबर महिन्यात होणाऱ्या क्रिकेट सीरिजवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. परंतु, या अनिश्चिततेचं वातावरणात बाजुला सारत ही सीरिज होणार असल्याची शक्यता भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय)नं व्यक्त केलीय.

Updated: Nov 10, 2015, 03:56 PM IST
डिसेंबर महिन्यात भारत-पाक सीरिजसाठी बीसीसीआय तयार, पण... title=

मुंबई : भारत - पाकिस्तान संबंध लक्षात घेता दोन्ही देशांदरम्यान डिसेंबर महिन्यात होणाऱ्या क्रिकेट सीरिजवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. परंतु, या अनिश्चिततेचं वातावरणात बाजुला सारत ही सीरिज होणार असल्याची शक्यता भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय)नं व्यक्त केलीय.

बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी ही सीरिज होण्याची शक्यता अजून कायम असल्याचं म्हटलंय. दिवाळीनंतर केंद्र सरकारकडून या सीरिजला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सीरिजवर काय निर्णय होतो, त्यावर सगळं अवलंबून आहे, असं मनोहर यांनी म्हटलंय. 

बीसीसीआयचे सेक्रेटरी अनुराग ठाकूर यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा केली असून ही सीरिज भारतात खेळवली जाण्याची शक्यता आहे. या सीरिजमध्ये पाच वन-डे आणि दोन टी-ट्वेन्टी मॅचेस खेळल्या जाणार आहेत.

बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये झालेल्या करारानुसार 2015 ते 2023 या कालावधीमध्ये सहा सीरिज खेळवणं बंधनकारक आहे. यातील चार सीरिज या पाकिस्तानात खेळल्या जाणार आहेत. पाकिस्तान टीम यापूर्वी 2012-13मध्ये भारतीय दौऱ्यावर आली होती. 

भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरिजची सांगता 7 डिसेंबर रोजी होणार आहे त्यानंतर जानेवारी महिन्यात सीमित ओव्हर्सच्या सीरिजमध्ये भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असेल. यामध्ये बीसीसीआयला पाकिस्तानविरुद्ध सामने आयोजित करण्यासाठी काही वेळ मिळू शकतो... 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.