ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचवा सामना जिंकणे भारतासाठी गरजेचे

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेली टीम इंडिया पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० ने पिछाडीवर आहे. आतापर्यंतच्या भारताने एकूण ८९५ सामने खेळलेत. त्यापैकी ४५० सामने भारत जिंकलाय तर ३९९ सामन्यात भारताच्या पदरी पराभव पडलाय. ३९ सामने अनिर्णीत राहिले. 

Updated: Jan 22, 2016, 11:53 AM IST
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचवा सामना जिंकणे भारतासाठी गरजेचे title=

सिडनी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेली टीम इंडिया पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० ने पिछाडीवर आहे. आतापर्यंतच्या भारताने एकूण ८९५ सामने खेळलेत. त्यापैकी ४५० सामने भारत जिंकलाय तर ३९९ सामन्यात भारताच्या पदरी पराभव पडलाय. ३९ सामने अनिर्णीत राहिले. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पाचवा आणि शेवटचा सामनाही भारताने गमावल्यास भारताचा हा ४००वा पराभव असेल. तसेच आयसीसी क्रमवारीत दुसरे स्थानही गमावण्याची शक्यता आहे. 

भारत वनडे रँकिंगमध्ये सध्या दुसऱ्या स्थानी आहे. भारताने पाचवा सामना जिंकल्यास त्यांच्या रँकिंगमध्ये काही फरक पडणार नाही. मात्र भारताने ०-५ ने मालिका गमाविल्यास भारत १११ गुणांसह न्यूझीलंडसह तिसऱ्या स्थानी राहील. मात्र गुणांच्या फरकाने न्यूझीलंड चौथ्या स्थानी आणि भारत तिसऱ्या स्थानी राहील.