सिडनी : भारतीय संघाने सिडनीच्या मैदानावर अखेरची टी-२० जिंकत ऑस्ट्रेलियाचा १४० वर्षांचा इतिहास बदलला. आतापर्यंत दिग्गज ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले नव्हते. मात्र धोनी ब्रिगेडनेही किमया करुन दाखवली. अखेरच्या षटकांत युवीने मारलेले दोन शॉटमुळे भारताला हा इतिहास रचता आला.
भारताला अंतिम षटकांत १७ धावांची गरज असताना अँड्यू टायच्या गोलंदाजीवर युवराज सिंगने धमाकेदार सिक्स आणि फोर लगावला. यामुळे भारत विजयाच्या समीप पोहोचला. युवीने पहिल्या चेंडूवर फाइन लेगवर फ्लिक केले आणि शानदार चौकार लगावला. त्यानंतरही तो थांबला नाही. पुढच्याच चेंडूवर त्याने लेग साईडला जबरदस्त टायमिंग साधत दमदार षटकार ठोकला. युवीच्या या दोन शॉटमुळे धावा आणि चेंडूतील अंतर कमी झाले.
संपूर्ण सिरीजमध्ये युवीला केवळ या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. मात्र या संधीचा त्याने पुरेपूर फायदा उचलला भारताला विजय मिळवून दिला.