भारत-पाक मॅच कोण जिंकणार, अक्रमने व्यक्त केले भाकीत

 येत्या रविवारी ढाकामध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यात कोण जिंकणार यावर बेटिंग सुरू असले तरी या सामन्याचे भाकीत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने व्यक्त केले आहे. 

Updated: Feb 23, 2016, 07:18 PM IST
भारत-पाक मॅच कोण जिंकणार, अक्रमने व्यक्त केले भाकीत title=

ढाका :  येत्या रविवारी ढाकामध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यात कोण जिंकणार यावर बेटिंग सुरू असले तरी या सामन्याचे भाकीत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने व्यक्त केले आहे. 

या सामन्यात भारताचं पारडं जड असून भारतच हा सामना जिंकणार असल्याचे वसीमने म्हटले आहे. 

तब्बल एक वर्षांनंतर पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. येत्या २७ फेब्रवारी रोजी साखळी सामन्यात दोघांची लढत होणार आहे. २०१५ मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ भिडले होते. 

दोघांनी सिरीज डिसेंबरमध्ये होणार होती पण  राजकीय परिस्थितीमुळे हे शक्य झाले नाही. 

भारताचा खेळ चांगला होत आहे. ते चांगल्या लईमध्ये आहेत, त्यामुळे माझ्या दृष्टीने ते फेव्हरेट आहेत, असे अक्रमने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. 

आशिया कप पहिल्यांदा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळविण्यात येत आहे.