धोनीच्या प्लानने मोठ्या संघाचे रिपोर्ट कार्ड बिघडविले - युवराज सिंग

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याने कर्णधार महेंद्रसिंग यांच्या नेतृत्त्वाची प्रशंसा केली आहे. वर्ल्ड कपमध्ये ज्या पद्धतीने टीम इंडिया खेळत आहे, त्यातून असे स्पष्ट होते की भारत आपला खिताब वाचविण्यात नक्कीच यशस्वी होणार असल्याची आशा युवीने व्यक्त केली आहे. 

Updated: Mar 16, 2015, 07:39 PM IST
 धोनीच्या प्लानने मोठ्या संघाचे रिपोर्ट कार्ड बिघडविले - युवराज सिंग title=

ग्वालियर : भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याने कर्णधार महेंद्रसिंग यांच्या नेतृत्त्वाची प्रशंसा केली आहे. वर्ल्ड कपमध्ये ज्या पद्धतीने टीम इंडिया खेळत आहे, त्यातून असे स्पष्ट होते की भारत आपला खिताब वाचविण्यात नक्कीच यशस्वी होणार असल्याची आशा युवीने व्यक्त केली आहे. 

धोनीच्या नेतृत्त्वाचे कौतुक करताना युवराजने म्हटले की, वर्ल्ड कपमध्ये भारताची शानदार कामगिरी सर्वांनी पाहिली आहे. हे केवळ धोनीच्या कुशल नेतृत्त्वामुळे शक्य झालं आहे. धोनीच्या गेम प्लानमुळे भारतीय टीमने मोठ-मोठ्या संघाचे रिपोर्ट कार्ड बिघडविले, असल्याचेही त्याने नमूद केले.

ग्वालियरमध्ये आयटीएम विद्यापीठाने युवराज सिंग क्रिकेट अकादमीचा शुभारंभ करण्यासाठी युवराज आला होता. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होता. वर्ल्ड कपमध्ये धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय संघ ज्या प्रकारे चांगली कामगिरी करीत आहे त्यामुळे स्पष्ट होते की, वर्ल्ड कप भारतच जिंकणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.