मला सामन्यात पाच विकेट घ्यायच्या होत्या : अश्विन

श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने आठ धावा देताना चार विकेट घेत सर्वोत्तम कामगिरी केली असली तरी स्वत: अश्विन मात्र या कामगिरीने खुश नाहीये. त्याला या सामन्यात पाच विकेट घ्यायच्या होत्या. 

Updated: Feb 15, 2016, 08:42 AM IST
मला सामन्यात पाच विकेट घ्यायच्या होत्या : अश्विन title=

विशाखापट्टणम : श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने आठ धावा देताना चार विकेट घेत सर्वोत्तम कामगिरी केली असली तरी स्वत: अश्विन मात्र या कामगिरीने खुश नाहीये. त्याला या सामन्यात पाच विकेट घ्यायच्या होत्या. 

चार बळी मिळवणाऱ्या अश्विनला सामनावीर तसेच मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. अश्विनच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने तिसरा सामना सहज जिंकत मालिका २-१ अशी जिंकली. 

'मी गोलंदाजीवर अधिक मेहनत घेतोय. टीममध्ये केवळ एक सदस्य म्हणून न राहता सामन्यात माझे योगदान देण्याचा नेहमी प्रयत्न असतो. चेंडू चांगला वळत होता. मला वाटले होते की मी पाच विकेट मिळवीन. मात्र पाच विकेट घेता आल्या नाहीत. नव्या चेंडूने गोलंदाजी करताना मी नेहमी विविध प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूला नेहमी फ्लाइट कऱण्याचा माझा प्रयत्न असतो,' असे अश्विनने सामना संपल्यानंतर सांगितले. 

कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही अश्विनसह इतर गोलंदाजांचेही कौतुक केले. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे श्रीलंकेच्या संघाला ८२ धावांवर रोखता आले. हा खूपचा चांगला सामना झाला. श्रीलंकेला आम्ही कमी धावांवर रोखले हे महत्त्वाचे. अश्विनने चांगली गोलंदाजी केली. त्याला इतर गोलंदाजांनी चांगली साथ दिली, असे धोनी म्हणाला.