विशाखापट्टनम् : भारती क्रिकेट टीममधून बाहेर पडलेल्या युवराज सिंग आयपीएल-८साठी सर्वाधिक बोली लागली. ती १६ कोटी रुपयांची. असे असताना त्याच्या खेळाने क्रीडारसिक नाराज आहेत. तसेच खरेदी करणाऱ्या टीम मालकाला लाभ होताना दिसत नाही. याबाबत युवीला एक प्रश्न विचारला गेला की, तुझ्यावर दबाब आहे का? यावरु युवीने उत्तर दिले, मी कोणाला १६ कोटी देण्यासाठी सांगितलेले नाही.
दिल्ली डेअरडेविल्सच्या या खेळाडूने सनलाइजर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला तो बोलला. हे वास्तव नाही. ज्यावेळी बोली चालली होती, त्यावेळी मी झोपलेले होतो. आणि मी कोणाला हे पैसे देण्याचे सांगितलेले नाही. जे पैसे मिळत आहे ते आयपीएल खेळण्यासाठी.
३३ वर्षीय युवराजला दुसरा प्रश्न विचारला गेला, टीम इंडियात तुझा कधी समावेश होईल? त्यावर त्याने उत्तर दिले, मी क्रिकेटचा आनंद लुटत आहे. मी पुढच्या वाटचालीबाबत विचार करत नाही. मला विश्वास आहे, दिल्ली डेअरडेविल्स टीम आपल्या कामगिरीत सुधारणा करेल. ११ सामन्यात सलग पराजय झाला असला तरी याआधीच्या सामन्यात विजय झाल्याने संघाचे मनोबल वाढले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.