हरभजन सिंग होणार 'बाप' माणूस

भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग लवकरच बाप होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. हरभजन सिंग आणि मॉडेल गीता बसरा यांचं 2015 मध्ये लग्न झालं होतं. 

Updated: Jun 2, 2016, 07:07 PM IST
हरभजन सिंग होणार 'बाप' माणूस title=

मुंबई : भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग लवकरच बाप होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. हरभजन सिंग आणि मॉडेल गीता बसरा यांचं 2015 मध्ये लग्न झालं होतं. 

जुलै महिन्यामध्ये गीता बसरा आई होणार आहे. 4 जूनला लंडनमधल्या घरी गीताचं डोहाळेजेवणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी हरभजन सिंगही लंडनला जाणार आहे. 

जुलैमध्ये प्रसुती झाल्यानंतर गीता बाळाबरोबर ऑक्टोबरमध्ये भारतात येण्याची शक्यता आहे.