कोहली-धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा

भारतीय क्रिकेटचे स्टार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे.

Updated: Jun 2, 2016, 06:11 PM IST
कोहली-धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा title=

मुंबई : भारतीय क्रिकेटचे स्टार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या दोघांचाही इएसपीएनच्या वर्ल्ड फेम 100 रॅकिंगमध्ये समावेश झाला आहे. 

इएसपीएननं जगभरातल्या टॉप 100 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये विराट कोहली आठव्या क्रमांकावर तर धोनी 13 व्या क्रमांकावर आहेत. या दोघांबरोबरच भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा या यादीत 41 व्या क्रमांकावर आहे. 

खेळाडूंचा पगार, जाहिराती, सोशल मीडिया फॉलोईंग आणि गुगल सर्च पॉप्युलॅरिटी या सगळ्या गोष्टींचा हे रॅकिंग बनवताना समावेश करण्यात आला आहे. 

या रॅकिंगमध्ये फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे, तर अमेरिकेचा बास्केट बॉलपटू लेब्रॉन जेम्स दुसऱ्या, अर्जेंटिनाचा फूटबॉलपटू लियोनल मेसी तिसऱ्या, फूटबॉलपटू नेमार चौथ्या आणि टेनिसपटू रॉजर फेडरर पाचव्या क्रमांकावर आहे.