क्रिकेटच्या 'चिकू'चा हॅपी बर्थ डे!

भारतीय क्रिकेटमधील प्रतिभावान खेळाडू म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली आज आपल्या वयाची 26 वर्ष पूर्ण करतोय.

Updated: Nov 5, 2014, 03:11 PM IST
क्रिकेटच्या 'चिकू'चा हॅपी बर्थ डे! title=

बंगळुरू : भारतीय क्रिकेटमधील प्रतिभावान खेळाडू म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली आज आपल्या वयाची 26 वर्ष पूर्ण करतोय.

5 नोव्हेंबर, 1988 रोजी दिल्लीत जन्मलेल्या विराट कोहलीला क्रिकेटमधील आपल्या योगदानासाठी अर्जुन पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलंय. 

अंडर 19 वर्ल्ड कप विजेता टीमचा हिस्सा असलेल्या विराटला आपल्या करिअरमध्ये पुढे संधी मिळाली. याच टूर्नामेंटमध्ये कोहलीनं आपल्या तुफानी खेळाचं प्रदर्शन करत भारतीय टीममध्ये आपली जागा मिळवली. 

‘2011 वर्ल्डकप’मध्ये आपल्या पहिल्याच मॅचमध्ये शतक ठोकून कोहलीनं एक नवा इतिहास रचला. वर्ल्डकपमध्ये पहिल्या मॅचमध्ये शतक ठोकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू बनला. परंतु, टेस्ट करिअरमध्ये आपली जागा बनवण्यासाठी मात्र कोहलीला बरेच प्रयत्न करावे लागले.

महेंद्रसिंग धोनीनंतर आता कॅप्टन म्हणून विराट कोहलीकडेच पाहिलं जातंय. सध्या, श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमध्ये कोहलीच भारतीय टीमची कॅप्टन्सी सांभाळतोय.

कोहलीला घरी त्याचे कुटुंबीय लाडानं चिकू नावानं हाक मारतात. कोहली हा टीममधला एकमात्र खेळाडू आहे ज्याच्या हातावर तुम्हाला टॅटू दिसेल. सिनेअभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत सध्या कोहलीच्या अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. 

जन्मदिवसानिमित्त क्रिकेटच्या ‘चिकू’ला खूप खूप शुभेच्छा... तुम्हालाही कोहलीला शुभेच्छा द्यायच्या असतील तर खाली कमेट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका...  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.