सिडनी : टी-२० मालिका सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला खुशखबर मिळालीये. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात खेळणार नाहीये.
दुखापतीमुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी ऑलराउंडर ट्रॅव्हिस हॅडचा समावेश करण्यात आलाय.
कॅनबेरा सामन्यादरम्यान मॅक्सवेलला दुखापत झाली होती. मात्र दुखापतीनंतरही तो सामन्यात खेळला होता. त्याने २० चेंडूत ४१ धावा केल्या होत्या.